नागपूर आऊटर रिंग रोडवरील कोतेवाडा येथे 'सर्व्हिस रोड'ची मागणी | Nagpur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 535

गुमगाव परिसरातून जाणाऱ्या नागपूर आऊटर रिंगरोडच्या रुंदीकरणादरम्यान कोतेवाडा मार्गाने गुमगाव, कोतेवाडा, वागधरा, कान्होली, धानोली, वडगाव-गुजर, सालईदाभा, दाताळा, एमपेरिअम सिटी, फायर आर्कर या गावांना जाण्यासाठी या मार्गावर सर्व्हिस रोडची कोणतीही व्यवस्था नसल्याने भविष्यात आम्ही या मार्गावर प्रवेश करायचा कसा, असा प्रश्न शेतकरी, शेतमजूर, कामगार, दुग्धव्यवसायिक व वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. कोतेवाडा येथून प्रवेश केल्यास नागपूर आऊटर रिंगरोडवरून शेती, दुकाने, कंपनी, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मिहान, सेझसारख्या नियोजित कामाच्या ठिकाणी कसे जायचे असा, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारू लागले आहेत. प्रशासनाने आमच्या गैरसोयीचा विचार करून रस्ता रुंदीकरणादरम्यान या मार्गावरून कोतेवाडा परिसरात सर्व्हिस रोडची सोय करून द्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरीकांनी दिला आहे. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires